वाकडी ग्रा.पं.सदस्य खूनप्रकरण चंद्रशेखर वाणीला १ पर्यंत कोठडी

0

जळगावः जामनेर तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मणे चांदणे वय ३७ यांचा अपहरण करुन खून केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणातील मुख्य संशयित चंद्रशेखर पद्माकर वाणी वय ४०, रा.वाकडी ता.जामनेर यास पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अपहरण करुन खून केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात राजेंद्र चांदणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे. मुख्य संशयित चंद्रशेखर वाणी यास अटक व्हावी यासाठी समाजबांधवांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या करुन घोषणाबाजी केली होती. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा स्विकारला होता. त्याची गंभीर दखल घेत त्याला ६ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी यापूर्वी महेंद्र राजपूत रा.शेळगाव ता.जामनेर, विनोद देशमुख, नामदार गुलाब तडवी दोघे रा.वाकडी ता.जामनेर यांना अटक करण्यात आली असून त्यांनाही १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप उर्फ पिंट्या संतोष परदेशी रा.डांभुर्णी ता.पाचोरा हा फरार आहे.