दोषींना फाशी शिक्षा देण्याची मागणी ; प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांचा ठिय्या
भुसावळ- जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मातंग समाजाच्या तरुणांना नग्न करून त्यांची धिंड करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ भुसावळात बुधवारी इन्साफ मोर्चा काढण्यात आला. जामनेर रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातून निघालेला मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
घोषणांनी शहर दणाणले
ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है, वाकडी घटनेतील दोषींना फाशी झालीच पाहिजे, पीडीताच्या परीवाराना 25 लाखांची मदत देऊन त्यांना शासकीय नोकरी द्यासह यासह विविध घोषणाबाजी आंदोलकांनी केल्याने शहर दणाणले. प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी जागेवरच ठिय्या मांडून पुन्हा घोषणाबाजी सुरू ठेवली. याप्रसंगी पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त करून वाकडी घटनेचा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याची मागणी करून दोषींना फाशी देण्याची मागणी केली
यांची होती उपस्थिती
इन्साफ मोर्चात संगीता ब्राह्मणे, भिकन लोखंडे, लक्ष्मण साठे, मनोज लोखंडे, गणेश रणदिवे, विलास गायकवाड, मुकेश बालसराफ, साहेबराव खडसे, विलास वालकर, अंकुश अवसरमल, मुकेश कांबळे, हेमंत साठे, पवन ठोकळ, अरुण खडसे, दीपक तांबे, अनिल शेलार, विनोद कसबे, मनोहर वासेकर, भारत अवसरमल, जय लोखंडे, रवी दाभाडे, दिलीप मरसाळे, नरेश मरसाळे, दीपक तांंबे, गजानन हिवाळे, अभय साठे, शेखर मोरे, पंकज वालेकर, हिरामण मोरे, आत्माराम भालेराव, राहुल भालेराव, किशोर वालेकर, पंकज पाठक यांच्यासह मातंग समाजातील महिला-पुरूषांची उपस्थिती होती. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्यासह शहर व बाजारपेठ पोलीस तसेच आरसीपी प्लाटूनच्या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला. प्रांताधिकारी प्रशासनाला आंदोलकांनी निवेदन दिले.