वाकडी प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी

0

जळगाव । जामनेर तालुक्यातील वाकडी येथे तिन मुलांवर अमानुष अत्याचार प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यातील पहिल्या दोन आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर उवरीत दोन आरोपींना 19 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. चौघांनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने न्यायालयीन कोठडी दिलेल्या दोघांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात मंगळवारी युक्तीवाद झाला. त्यानंतर न्यायाधिश न्या. एस.जी.ठुबें यांनी चौघांना 21 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

राजकीर दबावाचा संदर्भ
प्रल्हाद कैलास लोहार (वय-22), ईश्‍वर बळवंत जोशी (वय-30), अजित कासम तडवी (वय-20) आणि शकुनर सरदार तडवी (वय-23) सर्व रा. वाकडी असे चौघे आरोपींची नावे आहे. या चौघां आरोपींनी वाकडी तालुक्यातील तीन मुलांनी विहिरीत आंघोळ केल्यामुळेनग्न अवस्थेत मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात सुरूवातीला प्रल्हाद कैलास लोहार आणि ईश्‍वर बळवंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरण अधिक चिघळल्याने इतर दोघांना अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मात्र राजकीय दबावामुळे न्यायालयीन कोठडी दिलेल्या दोघांना पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यावर आज युक्तीवाद झाल्यानंतर न्या. एस.जी.ठुबें यांनी चौघांना 21 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.