राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरीत आंदोलन
पिंपरी : सामाजिक न्याय विभागवतीने जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मागासवर्गीय तरूणांनी विहीरीत अंघोळ केली म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली. राज्यात मागासवर्गीयांवरील वाढत्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध आंदोलन शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील तसेच महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, अध्यक्षा गंगा धेंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार यांनी केले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, सामाजिक न्याय अध्यक्ष विनोद कांबळे, महिला सामाजिक न्याय अध्यक्षा गंगा धेंडे, बाळासाहेब पिल्लेवार, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, अध्यक्षा वर्षा जगताप, नगरसेवक गोरक्ष लोखंडे, धनाजी विनोदे, पुष्पा शेळके, कविता खराडे, यतिन पारेख, मनिषा गटकळ, लता ओव्हाळ, सुभाष गावडे, अरुणा कुंभार, अशोक कुंभार, दिपक साकोरे, मनोज सुतार, विश्रांती पाडाळे, साकि गायकवाड, निलेश निकाळजे, शशिकांत घुले, दत्तात्रय जगताप, सचिन सकाटे, रुपाली गायकवाड, शशिकांत चौंडीकर, मिनाक्षी उंबरकर, उत्तम हिरवे, प्रशांत कडलग, संदीपान झोंबाडे, संतोष वाघेरे, सचिन आवटे, संगीता जाधव, विजय दळवी, सुर्यकांत पात्रे, अभिजीत भालेराव, शिवाजी सुरवसे, योगेश आयवळे, शशिकांत निकाळजे, अभिजीत आल्हाट, आकाश अंकुटे, हरेश लोट, गोविंद वाघेला, बुद्धभूषण निकाळजे, सुनिल अडागळे आदी अनेक पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.