ममता गायकवाड यांच्या हस्ते झाला शुभारंभ
वाकड : वाकड, हिंजवडी, बाणेर आदी परिसरातील पाणी पुरवठा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे वाकडमधील दक्षतानगर, कस्पटेवस्ती येथे अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या 160 मी.मी. व्यासाचे पाईप टाकण्याच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे वाकड परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. कामाच्या शुभारंभाप्रसंगी यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे, कनिष्ठ अभियंता सचिन कुतवळ यांच्यासह वाकड परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना महिलांनी तसेच उपस्थित नागरिकांनी केले.
गायकवाड यांनी केला पाठपुरावा
गेल्या काही महिन्यांपासून वाकड परिसरातील अन्य भागांमध्ये पाण्याची मोठी समस्या बनली आहे. येथील पाण्याची पाईपलाईन जुनी असल्या कारणाने या ठिकाणी पाणी कमी दाबाने येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. याबाबत नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार मांडली होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत गायकवाड यांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना करीत पाठपुरावा केला. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करावा. जोपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले होते. गेले काही दिवस या परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू होता. आज अमृत योजने अंतर्गत 160 मी.मी. व्यासाचे कऊझए पाईप टाकून या कामास सुरुवात करण्यात आली. यामुळे वाकड परिसराती पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी, महिलांनी गायकवाड यांच्याबद्दल आभार व्यक्त केले.