वाकड परिसरात ईसीए संस्थेची ई कचरा संकलन मोहीम

0

निगडीमध्येही मोहिम सुरू

वाकड : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन या संस्थेच्यावतीने दि. 19 व 20 मे या दोन दिवसांत वाकड परिसरातील काही भागात ई कचरा संकलन करण्याची मोहीम हाती राबविण्यात आली. यावेळी नगरसेवक संदीप कस्पटे, तुषार कामठे आदी उपस्थित होते. निसर्ग सृष्टी कस्पटे वस्ती, सुकासा वाकड, निसर्ग पूजा, नंदन इंस्पेरा, नंदादेप सोसायटी, शोनेस्त टोवर, निसर्ग सिटी, ऑरेंज प्रोव्हिन्स विशाल नगर आदींनी सहभाग घेतला होता. यासाठी विलास कुटे यांनी पुढाकार घेतला होता. या मोहिमेत तरुणांची संख्या लक्षणीय होती.

संगणकाशी संबंधित वस्तूंचा भर
या संकलन मोहिमेत संगणाकाशी संबंधित वस्तूंचा अधिक समावेश होता. जमा झालेला सर्व कचरा श्री रिसायकलर ह्या सरकारमान्य संस्थेच्या स्वाधीन करण्यात आला आणि प्लास्टिक व इतर वस्तू कागद काच पत्रा संकलन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी दत्तात्रय कुमठेकर, अरुण पाटोळे, विलास काटे, अरुण देशमुख, विकास आंबले, दादाराव आढाव, मनीष नांदगावकर, उमेश धने, धनेश दिघे, सुधीर देशमुख आणि तेजस्विनी आदी उपस्थित होते.

इसिएचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सोसायटीच्या सदस्यांना शून्य कचरा बाबत महत्व समजावून सांगितले. इ वेस्ट देणार्‍या प्रत्येकाला इसिएतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विकास पाटील यांनी सर्व सदस्यांना घेऊन पलाश सोसायटीच्या शून्य कचरा कार्यपद्धतीमधील ओला कचरा व्यवस्थापन विभागाला भेट दिली व कार्यपद्धती समजावून घेतली.