वाकड परिसरात दोन दिवसात दोन मजुरांचा पडून मृत्यू

0

वाकड : येथील कस्पटेवस्ती परिसरात विविध खासगी बांधकाम कंपन्यातर्फे बांधकाम सुरु आहे. मात्र, या बांधकाम साईटवर मजुरांना योग्य ती सुरक्षा साधने न दिल्याने मंगळवार व बुधवार या दोन दिवसात दोन मजुरांचा पडून मृत्यू झाला आहे. वर्धमान ड्रीम्स होम या साईटवर काम करत असताना निरापदा धिरेंद्र विश्‍वास (वय 44 ) याचा सेफ्टी बेल्ट तुटल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.26) दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली. वाकड येथे मंगळवारी (दि. 25) राजू क्षत्रिय विक्यानंद (वय 25 रा. वारजे) याचा कस्पटे वस्ती येथील वुड इस्टेट येथे काम करत असताना सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. सलग घडलेल्या घटनामुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.