तीन दिवसात मुलीचा घेतला शोध
पिंपरी : तीन दिवसात बेपत्ता मुलीचा शोध घेणार्या वाकड पोलिस ठाण्यातील अधिकार्यांचा शिवसेना रहाटणी काळेवाडी विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. लग्नाची तारीख जवळ आलेली त्यात घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ही मुलगी पळून गेली होती.
इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी राहत्या घरातून न सांगता निघुन गेली होती. ही गोष्ट आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. मात्र, वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन दिवसात मुलीला सुखरुप आई-वडिलांच्या स्वाधीन केले.यानिमित्त शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या हस्ते पोलिस अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिव व्यापारी सेना उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, भरत महानवर, नरसिंग माने, रविकिरण घटकार, भालचंद्र फंडतळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.