वाकड : सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दीड लाखांचे सोने चोरटयांनी पळविले. या घटना बावधन आणि वाकड परिसरात रविवारी (दि.7) संध्याकाळी साडेसात ते साडे आठच्या दरम्यान घडल्या. पहिल्या घटनेत वाकड येथील पलाश सोसायटीसमोर 44 वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील 38 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरयांनी हिसकावून नेले. दुस-या घटनेत बावधन येथे 57 वर्षीय महिला पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अवघ्या तासाभराच्या कालावधीत चोरट्यांनी दीड लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
या प्रकरणी वाकड व हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशीच घटना वाकड परिसरात 2 जानेवारी रोजी घडली होती अवघ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत दोन ठिकाणी सोनसाखळी चोरांनी महिलांच्या गळ्यातील दागीने हिसकावले होते. ज्यामध्ये दोन लाख रुपायांचे सोने चोरीला गेले होते. उच्चभ्रू सोसायटीच्या परिसरातही या चोर्या होत असून वयोवृद्ध महिलांना हे चोरटे लक्ष्य करत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.