वाकड येथील अनधिकृत बांधकावर हातोडा

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वाकड परिसरात चालू असलेल्या अनधिकृत बांधकामवर धडक कारवाई केली. यामध्ये 2221 चौरस फुट असलेल्या दोन आरसीसी बांधकाम, 2606 चौरस फुट असलेल्या सात अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तर, पत्राशेड मालक, ऑक्युपायर, विकासक यांनी स्वत:हून सात अनधिकृत पत्राशेड काढून घेतली. दोन जेसीबी, एक ट्रक व 20 कर्मचा-यांच्या सहकार्याने केली. कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.