एकाच दिवशी झाले सहा कामांचे भूमिपूजन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक 25 मध्ये गुरुवारी एकाच दिवशी एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मधील वाकड-ताथवडे येथील 24 व 18 मीटर रुंद रस्त्याचे आणि पुनावळे येथील अमृत योजनेतील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक मयूर कलाटे, अमित गावडे नगरसदस्या अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, प्रमोद ओंभासे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
वेळेची व इंधनाची बचत
वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असणारे रस्ते विकसित करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये वाकड काळाखडक सर्व्हे नं.125 पासून वाकड पोलीस ठाणे पर्यंत जाणारा 24 मिटर रस्ता, पुनावळे येथील चार विविध ठिकाणच्या 18 मीटर डीपी रस्त्यांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे सहा कोटी 55 लाख रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यामुळे भूमकर चौक ते वाकडकडे येणार्या जाणार्या वाहनांच्या वेळेची बचत व इंधनाची बचत होणार आहे. पुनावळे येथे अमृत योजनेअंतर्गत उद्यान करण्यात येणार आहे. हे उद्यान केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत होत असून या उद्यानासाठी केंद्र शासन 50% राज्य शासन 25 % पिंपरी-चिंचवड महापालिका 25 % निधी उपलब्ध करुन देणार आहे. या उद्यानाचे क्षेत्रफळ 211 एकर असून या परिसरातील पर्यावरणपुरक असे सुसज्ज उद्यान तयार करण्यात येणार आहे.