वाकोद : जागृत देवस्थान असलेल्या चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी होते. येथील देवस्थानाच्या दर्शना साठी पहुर येथून सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संतोष सुकदेव जाधव हे पत्नी प्रमिला, मुलगा हेमंत, मूली जयश्री, विद्या एकूण पाच जण दुचाकी क्र. एम. एच. १९ बी. एन. ८४८१ ने पहुर कडून वाकोद गावी येत असतांना वाडी जवळ असलेल्या पूला जवळ कुत्रे भांडण करीत दुचाकी समोरा रस्त्यात आल्याने दुचाकीचा अपघात झाला यात तीन जण जखमी झाले आहे तर संतोष जाधव यांना डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्या वर उपचार सुरु आहे.
वाकोद चौण्डेश्वर महादेव मंदिरावर श्रावण मासात या ठिकाणी जळगाव , औरंगाबाद , जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नवस फेडण्यासाठी व दर्शना साठी असंख्य भाविक येथे येतात श्रद्धावत भोजन देवून नवस फेडतात. येथे भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते. नावसाला पावणारे चौंडेश्वर मंदिर म्हणून सर्वत्र ख्याती निर्माण या ठिकाणाची झालेली आहे.