यावल- वाघझिरा गावाजवळील जंगलाकडून बांबू टोपले येत असताना गस्ती पथकाने धाव घेतल्यानंतर संशयीत पसार झाले मात्र घटनास्थळी 26 हजारांचे सागवान लाकडासह बांबू आढळल्याने ते जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. सागवान लाकूड पाच नग तसेच 11 हजार 100 सागवान बांबू जप्त करण्यात आले. यावल उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर, धुळे वन अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल गस्तीपथकातील वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनपाल सुनील पाटील, वनरक्षक संदीप पंडित, रवींद्र बी.पवार, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी, चालक भरत बाविस्कर आदींनी केली.