वाघडु येथे घरफोडी; २१ ग्रॅम सोन्यासह देव्हाऱ्यातील देवही चोरले 

0

चाळीसगाव :- तालुक्यातील वाघडु येथे दिनांक १६ रोजी रात्रीच्या सुमारास अद्न्यात चोरट्यानी घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन घरातील कापाट व लोखंडी पेटी मधुन २१ ग्रॅम सोन्याचे दागीने व देव्हाऱ्यातील देव चोरुन नेले आहे.

याबाबत माहिती अशी वाघडु ता चाळीसगाव येथे गावाच्या शेवटी महादेव रतन पाटील (६०) यांचे घर आहे दिनांक १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जेवण आटोपुन ते पत्नी व मुलगा असे घराला कुलुप लावुन घराच्या गच्चीवर झोपी गेले सकाळी ४-३० वाजेच्या सुमारास ते खाली आले तेव्हा त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन अद्यात चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडुन त्यातील १० ग्रॅम सोन्याची चैन, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, साडेतीन ग्रॅमची गळ्यातील पोत व लोखंडी पेटीतील लहान बाळाच्या अर्धा ग्रॅम च्या ३ सोन्याच्या अंगठ्या व देव्हाऱ्यातील चांदीचे ६ देव चोरुन मागच्या दाराने पलायन केले आहे घर गावाच्या शेवटी असल्याने चोरट्यांनी तेथुन पलायन केल्याची माहिती महादेव रतन पाटील यांनी दिली आहे.