चाळीसगाव। तालुक्यातील वाघडु येथे शिवराया मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सायंकाळी गावात मिरवणुक काढण्यात आली होती. याप्रसंगी शिवाजी महाराजाच्या अर्धाकृती पुतळ्यास संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याहस्ते माल्यार्पण करून व पुजन करण्यात आले तसेच शिवराया मित्र मंडळाच्या फलकाचे उद्घाटनही करण्यात आले. ग्रामस्थांसाठी सिमेंट बाकाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
ढोल ताश्यांच्या गजरात निघाली मिरवणूक
यावेळी शिवजयंती मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. ढोल ताश्याच्या गजरात शिवराया मित्र मंडळाच्या कार्येकत्यांनी गावात जल्लोषात शिवजयंती मिरवणुक काढण्यात आली. यावेळी राहुल पाटील, आप्पा पाटील, अनिकेत पाटील, संपत पाटील, माजी सरपंच गुलाब पाटील, ग्रा.प.सदस्य मधुकर पाटील, समाधान पाटील, किरण पाटील, भैय्यासाहेब पाटील, भूषण पाटील, बाळासाहेब पाटील, पांतोड्याचे अनिल पाटील, प्रवीण पाटील, निंबा पाटील, तुषार पाटील, भरत पाटील, निलेश पाटील, किरण पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील, गोमु पाटील, अरुण पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.