वाघळी गावातील आठवडे बाजारासाठी 22 लाखांचा निधी मंजूर

0

चाळीसगाव । आमदार उन्मेश दादा पाटील यांनी आमदार आदर्श गाव अंतर्गत घेतलेल्या वाघळी येथे आठवडे बाजारासाठी 22 लाख रूपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. सदर निधी हा 90 टक्के लोकवर्गणी व 10 टक्के ग्रामपंचायत टाकणार असून गावातील बहुतांश कामांना वेग आला आहे. या कामाला आमदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रयत्न तर जि.प.सभापती पोपट तात्या भोळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. वाघळी हे गाव मोठे व तेथील लोकसंख्या जास्त असल्यामुळे देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील, पोपट तात्या भोळे, सरपंच विकास चौधरी तसेच अधिकारी वर्गाचे मनापासून कौतुक केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
पणन महासंघाचे अधिकारी सुधीर वाघ, तांत्रिक अधिकारी निशिकांत भाले, बाजारक्षेत्र अभियंता अग्रवाल, सरपंच विकास चौधरी, ग्रा.पं. सदस्य प्रभाकर सोनवणे, ग्रा.पं.सदस्य जब्राबाई हकीम खान, रत्नाबाई खैरे, ग्रा.प. सदस्य अनिस मणियार, ग्रा.प. सदस्य समाधान महिरे, ग्रा.प. सदस्य विजय भंगाळे, चंद्रकांत राका माजी सरपंच, चंद्रकांत बोळे चेअरमन दुध सोसायटी, सुभाष सूर्यवंशी विकासो चेअरमन, नूर मुहम्मद पिंजारी, खुशाल भोळे, गिरीष बर्‍हाटे, आबा धोबी, तसेच गावातील ग्रामस्त यांचे मोलाचे योगदान व उपस्थित होते. यामुळे वाघळी गावातील मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये सौदर्य लाभेल तसेच आजूबाजूच्या परिसर अत्यंत सुंदर दिसणार आहे.