कर्तव्य कठोर सरपंच विकास चौधरी यांचे सर्वत्र कौतुक
चाळीसगांव- राज्यात आज जलसंधारणाअभावी शेती उजाड होत आहे ही वास्तविकता येत्या काळात भयानक रूप धारण करणार आहे पण वाघळी गावात पाण्याचे महत्व ओळखून प्रतिकूल परीस्थितीवर मात करताना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याच्या चळवळीत ग्रामस्थ योगदान देत आहे म्हणूनच वाघळी गावाच्या योगदानाची प्रसार माध्यमांनी वेळोवेळी दखल घेतली आहे गावकर्यांच्या मदतीने ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या या अतुलनीय केलेल्या कामाची दखल घेवून ह्युमन सव्हिस फाउंडेशन व मीडिया जक्झिबिटर्स प्रा. ली.यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित कृषीथाँन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पातळीवरील आदर्श जलसंवर्धक पुरस्कार वाघळी गावाला देण्यात आला यावेळी कृषीथाँन चे आयोजक प्रमुख पाहूणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हेमंतराव टकले, एकनाथ डवले राज्य सचिव कृषी. जलसंधारण व रोजगार हमी योजना तसेच वनाधिपती विनायकदादा पाटील, सुभाष खेमनार , रमेश मताने, मिलिंद मुरूगकर, संजय न्याहारकर, साहील न्याहारकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. आपल्या कर्तव्याप्रती अतिशय प्रामाणिक असलेले विकास चौधरी यांनी गावात राबविलेल्या सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी गावकर्यांना विश्वासात घेऊन केली यामुळे ते तालुक्यात लोकप्रिय सरपंच म्हणून ओळखले जातात तसेच गावात करण्यात आलेल्या सर्व कामाच्या दर्जा बाबत कुठलीही तडजोड न करता त्यांनी वेगळा नावलौकिक मिळविला आहे कामात कसूर केल्यास त्या ठेकेदार व यंत्रणे विरोधात कारवाई व उपोषण करताना त्यांनी भाडभिड न ठेवल्याने त्यांचा नेहमी शासकीय पातळीवर सन्मान झाला आहे आजचा सन्मान गावकर्यां नी केलेल्या सहकार्यातून झालेल्या विकासकामांचा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे याप्रसंगी पुरस्कार सोहळ्याला सरपंच विकास चौधरी, कृषी सहाय्यक राजेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ महाजन, विजय भंगाळे, ग्रामसेवक अनील पगारे, आबा धोबी, संदीप महाराज (पातोंडा)आदी उपस्थित होते.