वाघळी पाणीपुरवठ्यासाठी मुंदखेडे धरणातून पाणी आरक्षण मंजूर

0

चाळीसगाव । तालुक्यातील आमदार आदर्शगाव योजनेत घेतलेले मौजे वाघळी गावासाठी आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मुंदखेडे धरणावर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. नुकताच यासंदर्भातला जलसंपदा विभागाचा शासन निर्णय मंगळवारी 28 ऑगस्ट 2017 रोजी पारित करण्यात आला आहे. सदर पाणी आरक्षणासाठी आमदार उन्मेश पाटील व जि.प. सभापती पोपटतात्या भोळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. वाघळी गावाची वाढती लोकसंख्या लोकसंख्या लक्षात घेऊन सदर पाणी आरक्षित करण्यात आले असल्यामुळे पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. यात वाघळी गावासाठी मुंदखेडे धरणावरून 0.160 दलघमी पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. सदर योजनांसाठी धरणावरून आरक्षण मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद सभापती पोपटतात्या भोळे, सरपंच विकास चौधरी व वाघळी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.