वाघळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 160 रुग्णांची तपासणी

0

47 रुग्णांचे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी रवानगी
चाळीसगाव – सामाजिक व आरोग्य कार्यात अग्रेसर असणार्‍या मारवाडी युवा मंच शाखा चाळीसगाव रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव तसेच यशवंत पब्लिक स्कूलच्या वतीने आज नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीमती अरुणा बाई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचे वाघळी गावात दुसर्‍यांदा आयोजन करण्यात आले होते त्यामुळे या तपासणी शिबिरात 160 रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली यावेळी गरज असलेल्या 47 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना सायंकाळी मालेगाव येथे पाठवण्यात आले

शिबिरात आढळले सर्वाधिक 47 रुग्ण
या शिबिराच्या निमित्ताने 160 पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आय हॉस्पिटल मालेगाव च्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने या सर्व नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांचा तिरळेपणा ,नजर कमी असणे या सह डोळ्यांच्या सर्व आजारांची तपासणी करण्यात आली यावेळी गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले आज जवळपास 47 रुग्णांना डोळ्यांची शस्त्रक्रिया असल्याचा दाखला दिल्यानंतर सायंकाळी आयोजकांनी सर्व रुग्णांची मोफत वाहतुकीची व्यवस्था करून त्यांना मालेगाव येथे पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आले त्यावर होणारा खर्च जेवणाचा खर्च देखील मारवाडी युवा मंच पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.

यांनी घेतले परिश्रम
या शिबिरासाठी मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष समकीत छाजेड सचिव पंकज दायमा यशवंत पब्लिक स्कूलचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी संचालिका जयश्री सूर्यवंशी मुख्याध्यापिका अनिता खंडेलवाल तसेच मारवाडी युवा मंचच्या सदस्य योगेश खंडेलवाल अजय जोशी डॉ स्वप्नील लढे, संजय अग्रवात, मनोज चव्हाण, इशू वर्मा, प्रवीण दायमा, भरत दाय मा, प्रमोद दायमा, प्रितेश कटारिया, रविराज पाटील, गणेश अहिरे, मालेगाव आय हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच यशवत पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मारवाडी युवा मंचच्या सर्वत्र कौतुक
चाळीसगाव येथील मारवाडी युवा मंचच्या शाखेच्या वतीने आज पर्यंत विविध भागात 17-18 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये खडकी हिरापुर तळेगाव तसेच वाघळी याप्रमाणे शहरातील विविध भागात तहजीब हायस्कूल ,रमाबाई आंबेडकरनगर ,पाटील वाडा ,महाराणा प्रताप हाउसिंग सोसायटी यासह विविध भागात आतापर्यंत 3 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे या पैकी जवळपास 300 पेक्षा अधिक नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या सातत्याने आयोजित डोळे तपासणी शिबिरामुळे आजवर अनेक गरजूंना मदत झाली त्यामुळे सर्वत्र मारवाडी युवा मंचच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.