वाघळू गावाजवळ रा.काँ.च्या युवक जिल्हा उपाध्यक्षावर हल्ला

0

चाळीसगाव। तालुक्यातील वाघळू येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांच्यावर 4 एप्रिल 2017 रोजी चाळीसगावच्या 5 जणांनी त्यांच्या वाघळू गावाजवळ असलेल्या धाब्यावर (हॉटेल) जेवणाचे बिल मागण्याच्या कारणावरून हल्ला चढवला असून त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांनी रुग्णालयात दिलेल्या जाब जबाबावरून 5 आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भैय्यासाहेब आधार पाटील रा वाघळू ता चाळीसगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष आहेत.

तसेच वाघळू गावाजवळ त्यांचे हॉटेल संकेत नावाचा ढाबा देखील आहे. या धाब्यावर 4 एप्रिल 2017 रोजी आरोपी महेमूद चिकनवाला, हैदर, आरीफ, शाहरुख, नदीम सर्वांचे पूर्ण नाव माहित नाही सर्व राहणार चाळीसगाव हे जेवणासाठी गेले होते. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास भैय्यासाहेब पाटील यांनी वरील 5 जणांना जेवणाचे बिल मागितले असता त्यांनी आम्हाला बिअर दिली नाही तर पैसे कशाचे देऊ, असे म्हणून त्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली व त्यांच्या हॉटेलच्या काउंटरची काच फोडून फायबरच्या खुर्च्यांची तोडफोड केली व आरोपी मेहमूद चिकनवाला याने त्याच्या हातातील काहीतरी लोखंडी वस्तू त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली.