मुक्ताईनगर न्यायालयाने सुनावली 28 पर्यंत वनकोठडी
मुक्ताईनगर :- वाघाच्या शिकारीसाठी काही शिकारी डोलारखेडा जंगलात आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 39 जिवंत गावठी बॉम्ब, दोन धारदार सुरे व दुचाकी जप्त करण्यात आली असून आरोपींना न्यायालयाने 28 पर्यंत वनकोठडी सुनावली.
जनार्दन गजनसिंग भोसले, सोना गुलाब पवार (दोघे रा.हलखेडा) व माणिक देवराम बेलदार (रा.डोलारखेडा) अशी अटकेतील शिकार्यांची नावे आहेत. डोलारखेडा जंगलात वाघाचा अधिवास असून अनेकदा ट्रॅप कॅमेर्यात छबीदेखील कैद झाल्या आहेत. काही शिकारी या भागात शिकारीसाठी आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल पी.पी.शेनुळे, फणसे, वनरक्षक डी.जी.पवार, धुळगंडे, तडवी आदींसह वनमजूर यांनी तत्काळ वनक्षेत्राची पाहणी करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.