चंद्रपूर : ताडोबातील बफर क्षेत्रात रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे . ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. दुकानदार लघुशंकेसाठी दुकानाच्या मागे गेला असता वाघाने हल्ला चढवला. संदीप अर्जुन तितरे असे या इसमाचे नाव आहे. तो राळेगावचा रहिवासी असून दुकानात काम करत होता. याआधीही असे हल्ले झाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.