वाघाडी ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर

0

वाघडी । शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील ग्रामपंचायतीची वार्ड रचना आणि जाती निहाय आरक्षण जारही करण्यात आले. यावेळी तलाठी भुषण चौधरी, मंडळ अधिकारी एस. बी. म्हसळकर उपस्थित होते. ग्रामपंचायतीत झालेल्या या विशेष सभेत सरपंच विमलबाई भिल, उपसरपंच सतिष पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.एस. वाघ, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, बापु पाटील, प्रशांत देशमुख, अर्जून माळी, सुशिलाबाई कोळी, निर्मलाबाई पवार, उज्वला ठाकूर. संगीता चौधरी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, शांतीलाल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंडळ अधिकारी एस. बी. म्हसळकर यांनी आरक्षण जाहीर केले. यात पुरूषांसाठी 7 तर महिलांसाठी 8 अशा एकूण 15 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

वार्डनिहाय आरक्षण
वॉर्ड क्र. 1 नामाप्र जनरल पुरूष (1), सर्वसाधारण स्त्री (1), जनरल (1) वार्ड क्र. 2 नामाप्र स्त्री (1), सर्वसाधारण स्त्री (1), जनरल (1) वार्ड क्र. 3 नामाप्र स्त्री (1), सर्वसाधारण स्त्री (1), जनरल (1) वार्ड क्र. 4 अनुसूचित जमाती पुरूष (1), नामाप्र पुरूष (1), अनुसूचित जमाती स्त्री (1) वार्ड क्र. 5 अनुसूचित जाती पुरूष (1), अनुसूचित जमाती (1), सर्वसाधारण स्त्री (1)अशा एकूण पंधरा जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.