भारतीय जनता पक्षाच्या सिंहाने या महामेळाव्याच्या निमित्ताने युतीसाठी टाळी देण्यासाठी पुढे केलेला हात शिवसेनेच्या वाघाने मात्र झीडकारला आहे. शिवसेनेचा वाघ हा पिंजर्यातील वाघ नाही. त्यामुळेच तो राज्याच्या आणि राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. या वाघाला आता रोखणे किंवा गोंजारणे अशक्य आहे, अशा शब्दात शिवसेनेने आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. भाजपा अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमला आहे. त्यामुळे त्यांना सध्या मित्रपक्षांची गरज राहिलेली नाही, ते आपण स्वयंभू असल्याचे भासवत आहेत. मात्र, 2019 चे चित्र पूर्ण वेगळे असेल. असे शिवसेनेने आता भाजपला सुनावले आहे.
मुंबईत भारतीय जनता पक्षाने स्थापना दिनाच्या निमित्ताने आपली राजकिय भूमिका स्पष्ट करत शिवसेनेला पुढील युतीसाठी गोंजारण्याची भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाच्या सिंहाने या महामेळाव्याच्या निमित्ताने युतीसाठी टाळी देण्यासाठी पुढे केलेला हात शिवसेनेच्या वाघाने मात्र झीडकारला आहे. शिवसेनेने आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. भाजपा अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमला आहे. त्यामुळे त्यांना सध्या मित्रपक्षांची गरज राहिलेली नाही, ते आपण स्वयंभू असल्याचे भासवत आहेत. मात्र, 2019 चे चित्र पूर्ण वेगळे असेल. असे शिवसेनेने आता भाजपला सुनावले आहे.युपीएत समाविष्ट असलेला तेलगू देसम पक्ष मोदींनी लाट दिसताच एनडीएत शिरला आणि आता बाहेरही पडला. मात्र, शिवसेनेचा वाघ हा पिंजर्यातील वाघ नाही. त्यामुळेच तो राज्याच्या आणि राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. या वाघाला आता रोखणे किंवा गोंजारणे अशक्य आहे, अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले आणि ते अजूनही उडतच आहे. आता हे विमान खाली उतरवण्यासाठी जमीन नाही. कारण उत्तरप्रदेशातील फुलपूर-गोरखपूरमधील पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आणि सहकारी पक्ष निघून चालल्यावर त्यांना काही गोष्टी सुचू लागल्या आहेत, असा टोला हाणायला उध्दव ठाकरे विसरलेले नाहीत.
भाजपाच्या स्थापना मेळाव्यात त्यांचे राष्ट्रीय विचारही वाहुन गेले आहेत, असे शिवसेनेचे मत आहे. भाजपाच्या स्थापनेनिमित्त झालेल्या मु्ंबईतील मेळाव्यात अमित शहा यांच्याकडून भ्रष्टाचार, काश्मीर हिंसाचार, दलित हिंसाचार या विषयांवर परखडपणे मत मांडण्याची आवश्.कता होती, असे शिवेनेला वाटते. याआधिच खआसदार संजय राऊत यांनी युतीची बोलणी करण्याची वेळ आता टळून गेले हे स्पष्ट केले होते. एकूणच शिवसेनेच्या वाघाने भाजपच्या सिंहाची टाळी सध्या तरी धुडकावली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीची शक्यता धुसर झाली आहे. आता त्यापुढील राजकिय घडामोडींकडे राजकिय चाणक्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यातील सर्वात मोठा रोल काँग्रेसचा दिसतो आहे.
अमित शहांनी आपल्या भाषणात राहूल गांधींची खिल्ली उडवताना त्यांना पवारांनी इंजेक्शन दिल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते फार उडू लागले आहेत, असे ते म्हणाले होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि कांग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या दोनदा राजकिय भेटी झाल्या. दोन वेळा या दोन्ही नेत्यांत झालेल्या या दोन भेटींकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे. या भेटीचे अनेकानेक अन्वयार्थ काढले जात आहेत. ही भेट राजकीय असली, तरी भेटीतील चर्चेचा तपशील समोर आला नाही. परंतु, या दोन नेत्यांची भेट ही मोठ्या राजकीय घडामोडीच्या शक्यतेकडे जाणारी आहे, असे वाटायला वाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे स्वतः आघाडी होऊ शकेल, अशा भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. तर, अलीकडच्या काळात शरद पवार हेही अनेकदा राहुल यांच्याबद्दल सकारात्मक बोलताना दिसत आहेत. पवारांच्या कोणत्याही दीर्घकालीन दृष्टिकोनात वेगवेगळी गणिते दडलेली असतात. असे असले, तरी ‘मी पंतप्रधानपदाचे स्वप्न सोडून दिले आहे,’ असे पवार यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. पवार असे म्हणत असले, तरी त्यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याने ‘मुख्य’ स्वप्न मनापासून सोडले असेल, असे म्हणणे अतिधाडसाचे ठरेल. त्यामुळेच, त्यांच्या या भेटीमागचा एक अन्वयार्थ त्यांचे ‘मुख्य’ स्वप्न हा आहे, असे म्हणता येईल.
आगामी काळासाठी काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर आघाडीच्या राजकारणासाठी शरद पवार हे एक उत्तम पर्याय असू शकतात. म्हणूनच राहूल गांधी यांनी त्यांना जवळ केले आहे. कारण, काँग्रेसची आघाडी केवळ सप-बसप या पक्षांपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यासाठी भाजपची अडचण असलेले तमिळनाडू अन् पश्चिम बंगालमधील प्रमुख पक्षांशी आघाडी करावी लागेल. या आघाडीच्या राजकारणाला एका जागेवर आणण्यासाठी पवार जास्त यथायोग्य पर्याय ठरू शकतात. आघाडीच्या राजकारणाची मोट बांधण्यापासून काँग्रेसची ताकद वाढवण्यापर्यंत सगळ्याच शक्यतांवर पवारांचा पर्याय जास्त व्यवहार्य ठरू शकतो. सध्याची काँग्रेस अनेक राज्यांत पर्यायी पक्ष म्हणून जिवंत राहिलेली नाही. ज्या उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तिथे तरी काँग्रेस जवळपास बेचिराख झाल्यात जमा आहे. अशा स्थितीत पवारांचा काँग्रेसने धरलेला हात काँग्रेसला काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो. देशात तीसरी आघाडीही उभी राहण्याच्या हालचाली हळू हळू सुरू झाल्या आहेत. त्यात कम्युनिस्ट पक्ष, अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारीप बहुजन महासंघापासून ते इतर सारे डावे पुरोगामी पक्ष एकत्र झाले तर त्याचा तोटा काँग्रेसला होवू शकतो. त्यांचे मन वळवण्याची ताकत पवांरामध्ये आहे. म्हणूनच काँग्रेस धुरीनांनीही धोडे बोटचेपे धोरण स्विकारत पवारांना जवळ करण्याची भूमिका स्विकारली आहे. आत राज्यात उरतो प्रश्न शिवसेना आणि मनसेचा. तर पवार त्यांचा यथायोग्य वापर करून भाजपला नमवण्याचा प्रयत्न करतील. हे ओळखूनच भाजपच्या सिंहांनी शिवसेनेच्या वाघापुढे टाळीसाठी हात पुढे केला होता. आता सिंहाची पुढची रणनिती काय ते पाहावे लागेल.