भुसावळ- वाघूर डॅमवरील व्हॉल चोरी प्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींकडून पोलिसांनी पुन्हा 12 व्हॉल जप्त केले असून त्याची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक निशिकांत जोशी यांनी तपासात बुधवारी सकाळी पुन्हा चोरट्यांकडून 96 हजार रूपये कींमतीचे 12 व्हॉल जप्त केले. वांजोळा रोडवरील पेपरमीलच्या जवळ नाल्याच्या चारीत लपवून ठवलेले 12 व्हॉल चोरट्यांनी काढून दिले. यामुळे पोलिसांनी आतापर्यत चोरीतील 31 व्हॉल चोरट्यांकडून जप्त केले. यापूर्वी पोलिसांनी एक लाख 99 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आता 96 हजार रूपये किंमतीचे व्हॉल जप्त केले आहे. असे दोन लाख 95 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील संशयीत सचिन दशरथ डोळे (रा. दिनकर नगर जळगाव) ज्ञानेश्वर डिगंबर दोळे, महेंद्र कोळी, मनोज तायडे, योगेश दोळे आणि एक अल्पवयीन बालक यांच्यावर कारवाई करण्यात आली. यातील अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे. अल्पवयीन बालक वगळता अन्य संशयीतांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जोशी तपास करीत आहे.