वाघूर प्रकल्पातील पाणी शेतीसाठी देण्याची मागणी

0

आमदार संजय सावकारेंनी दिले जलसंपदा मंत्र्यांना पत्र ः तत्काळ बैठकीचे निर्देश

भुसावळ- वाघूर प्रकल्पातील बॅक वॉटर कुर्‍हे पानाचे परीसरातील देण्यासंदर्भात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना 5 रोजी पत्र दिले असून महाजन यांनी पत्राची तातडीने दखल घेत तत्काळ संबंधित विभागाला बैठक घेण्याचे सूचित केल्याने हा प्रश्‍न मार्गी लागण्याची आशा आहे.

शेतीसह पाणीप्रश्‍न सुटणार
कुर्‍हेपानाचे परीसरातील शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी आमदार सावकारे यांच्याकडे वाघूर धरणातील बॅक वॉटरचे पाणी शेतीसह पिण्यासाठी दिल्यास या भागातील पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचा आशावाद निवेदनाद्वारे व्यक्त केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जलसंपदा मंत्री यांना आमदार सावकारे यांनी पत्र देऊन हा प्रश्‍न कायमस्वरूपीरीत्या सोडवण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाचे लवकरच बैठक होणार असून त्यात शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.