वाघूर प्रकल्पातून शेती सिंचनासाठी आवर्तनाची मागणी

0

जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांचा पुढाकार ; तर शेतकर्‍यांचे आंदोलन

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हे पानाचे भागातील शेतकर्‍यांची शेती सिंचनाखाली यावी यासाठी शेतकर्‍यांनी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे आणि माजी जिल्हा परीषद सदस्य समाधान पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी मागणीची पुर्तता न झाल्यास शेतकर्‍यांनी आंदोलन केले जाईल, असा पवित्रा घेतल.

दखल न घेतल्यास आंदोलन
तालुक्यातील कुर्‍हे पानाचे भागात अडीच हजार हेक्टर शेजमीन आहे शिवाय या परीसरात चारही बाजूने लहान मोठे तलाव आहेत मात्र या भागात मोठी नदी व अल्पशा प्रमाणात होणार्‍या पावसामुळे तलाव सतत कोरडे असतात.परीणामी या तलावांचा परीसरातील शेतकर्‍यांना काही एक उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी या भागातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले मात्र अद्यापही शेतकर्‍यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने बुधवारी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य समाधान पवार यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सुरेश शिंदे, उपसरपंच वासु वराडे, माजी उपसरपंच रविंद्र नागपूरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद उंबरकर, प्रवीण नागपुरे, किरण कळसकर, धोंडु गांधेले, नाना गांधेले, शाम बडगूजर, प्रमोद नागपुरे, योगेश गांधेले, पुंजो पाटील, उत्तम महाजन व शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचनसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनाची दखल न घेतल्यास शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील, असा इशारा देण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी निवेदन स्विकारून शेतकर्‍यांच्या भावना जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सिंचनापासून वंचित
कुर्‍हे पानाचे गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वाघूर प्रकल्प आहे मात्र या प्रकल्पाचा या परीसरातील शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. यामुळे सिंचनापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीवरच अवलंबून रहावे लागत आहे. परीणामी शेतकरी अल्पशा उत्पादनामूळे कर्जबाजारी होत असल्याने शेतकरयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

यापुर्वीही प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन
या भागातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी शेतकर्‍यांनी भुसावळचे प्रांताधिकारी यांनाही निवदेन दिले आहे मात्र त्यांच्या या मागणीच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बुधवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन देण्यात आले. निवेदनावर एक हजार शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

शेतकर्‍यांनी केली पाहणी
परीसरातील शेतकर्‍यांनी वाघुर प्रकल्पातील पाणी आपल्या शेतापर्यंत कसे येईल यासाठी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य समाधान पवार यांच्या नेतृत्वाखाली वाघुर प्रकल्प परीसराची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत 80 ते 90 शेतकरी उपस्थित होते मात्र सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून देखील त्यांनी शेतकर्‍यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.