औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ; आतापर्यंत सर्व प्रकारच्या कार्यवाहीला स्थगिती ; तक्रारदार अॅड. विजय पाटील यांची माहिती
जळगाव – जळगाव विमानतळ, वाघूर व जिल्हा बँकेतील आयबीपीसह पाच घोटाळ्यांचा विशेष तपास फोर्स (एसआयटी) मार्फत फेरतपास करण्यात यावा, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे, व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निकाल दिला. आजपावेतो या पाचही गुन्ह्यातील करण्यात आलेली सर्व कार्यवाहीला स्थगिती देण्यात आल्याचेही निकालात नमूद असल्याची माहिती तक्रारदार विजय पाटील यांनी जनशक्तिशी बोलतांना दिली.
विमानतळ, वाघूर तसेच जिल्हा बँकेच्या आयबीपी (इनलॅण्ड बील पर्चेसिंग), स्टार्च फॅक्टरी, महावीर बँक या बहुचर्चित घोटाळ्याप्रकरणी शहर पोलीस ठाणे व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. गुन्ह्याचा तपास स्वतंत्र एसआयटी मार्फत करण्यात यावा, असा अर्ज तक्रारदार अॅड विजय पाटील यांच्यावतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात देण्यात आला होता. त्यावर खंडपीठाने जिल्हा बँकेसह विमानतळ व वाघूर पाच गुन्ह्याचा विशेष तपास फोर्स (एसआयटी) मार्फत फेरतपास करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे, व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने शनिवारी हा निकाल दिला. आजपावेतो या पाचही गुन्ह्यातील करण्यात आलेली सर्व कार्यवाहीला स्थगिती देण्यात आल्याचेही निकालात नमूद असल्याची माहिती तक्रारदार विजय पाटील यांनी जनशक्तिशी बोलतांना दिली.
तत्कालीन पोलीस अधिकार्यांची भूमिका संशयास्पद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असतांना सुरेशदादा जैन कुठलेही ठराव, तारण न ठेवता केवळ अर्जावर उद्योजकांसह कंपन्यांना बेकायदेशीररित्या कर्ज पुरवठा, आयबीपी (इनलॅण्ड बील पर्चेसिंग), स्टार्च फॅक्टरी, व महावीर बँक अशाप्रकारे जिल्हा बँकेत 600 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी स्व. नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात 270/2012 व 271/2012 प्रमाणे तीन गुन्हे दाखल आहेत. यात आयबीपीचा सर्वात जास्त म्हणजे 477 कोटींचा घोटाळा आहे. यात तपासअधिकारी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव जिल्हा बँकेत अशाप्रकारे गैरव्यवहाराचे कुठलेही गुन्हे घडल्याचे नसल्याबाबत सी समरी दिली होती. या सी समरीविरुध्द तक्रारदार अॅड. विजय पाटील यांनी खंडपीठात धाव घेवून चुकीचा तपास होत असून या गुन्ह्यांचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा, असा अर्ज दिला होता. या अर्जावर औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठासमोर कामकाज सुरु होते.
एसआयटी पथकात यांचा आहे समावेश
खंडपीठाने तोंडी निकालाचे वाचन केले. त्यात अर्जानुसार वाघूर, विमानतळ व जिल्हा बँकेचे आयबीपीसह तीन गुन्हे अशा पाचही गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे उच्च अधिकारी, नाफेडचे उच्च अधिकारी, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिश व दोन आयपीएस दर्जाचे अधिकारी अशा पाच जणांचा एसआयटीमध्ये समावेश आहे. या पथकाकडून पाचही घोटाळ्यांचा सुरुवातीपासून फेरतपास करण्यात येणार आहे.