गुजरात । राष्ट्रपती निवडणुकीत गुजरातमधील क्रॉस वोटिंगचा प्रकार समोर आल्यानंतर 24 तासांच्या आत शंकर सिंह वाघेला यांनी बंडखोरी जाहीर केली आहे. वाघेला यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थकांना बोलावले होते. त्या सभेत बोलतांना वाघेला यांनी काँगे्रस पक्षाने आपल्याला काढण्याचा निर्णय घेतला असला, तरी आपण स्वतः पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला मुक्त करत आहे, असे घोषित केले.
क्रॉस व्होटिंगचा आरोप धुडकावला
गुजरात काँग्रेसने वाघेला यांच्या सभेत उपस्थित राहण्यास काँग्रेसच्या नेत्यांना मनाई केली होती. राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस वोटिंगला वाघेला यांचा गट
कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपमध्ये कधीच जाणार नाही
यावेळी वाघेला यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आपण आपल्या आत्मसन्मानाविषयी कदापी तडजोड करणार नाही. आपला राजकीय इतिहास प्रदीर्घ आहे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही होतो, भविष्यात मी कुठेही जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, असेही वाघेला म्हणाले.
1940 मध्ये जन्मलेले वाघेला यांनी राजकीय आयुष्याची सुरुवात जनसंघापासून केली होती. नंतर जनता पक्षात व त्यानंतर भाजपमध्ये काम केले.
1996 मध्ये वाघेलांनी भाजपला रामराम ठोकून स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय जनता पार्टी.
1996-97 ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. नंतर राष्ट्रीय जनता पार्टीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले.
1984-89 राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा लोकसभा सदस्य होते.
2004-09 या यूपीए-2च्या काळात ते केंद्रात वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातमधील कापडवंज येथील आमदार आहेत.