चोरट्यांनी मंदिरासह तीन ठिकाणीही केला चोरीचा प्रयत्न : ग्रामस्थांमध्ये भीती
रावेर- तालुक्यातील वाघोड येथे बुधवारी पहाटे चोरट्यांनी घरओडी करीत मंदिरासहीत तीन ठिकाणी बंद घर फोडण्याचा प्रयत्न केल्याने गावासह परीसरात ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. यापूर्वीही तालुक्यात अनेक ठिकाणी चोर्या झाल्या असून त्यांचा तपास थंडबस्त्यात नव्याने होणार्या चोर्यांमुळे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. वाघोड गावातील गोपाळ मिस्तरी यांच्या घरातून चोरट्यांनी 20 हजारांचा मुद्देमाल लांबवत सामानाची फेकाफे केली तर गावातच असलेल्या राममंदिरासह भास्कर सातव, अशोक चौधरी, रघुनाथ मोपारी यांचे बंद घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी अंगणवाडीचे कुलूप तोडण्यात आले. रावेर पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी धाव घेतली.