भुसावळ- रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात 7 जलै 2015 रोजी पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी गुरेलाल बारेलाविरूध्द गुन्हा सबळ पुराव्याअभावी शाबीत होऊ शकला नसल्याने येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने बारेला याची बुधवारी निर्दोष मुक्ततात केली. वाघोड शिवारात राहात असलेला गुरेलाल बारेला याने 7 जुलै 2015 रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास त्याची पत्नी लक्ष्मीबाई बारेला (40) हिचा दगडाने ठेचून खून केला. याचा त्याला पश्चाताप झाल्याने त्याने रावेर पोलिसात जाऊन झालेला प्रकार कथन केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सिध्दार्थ खरे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत बारेला विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. यात 11 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. संशयीत बारेलातर्फे अॅड. प्रफुल्ल आर पाटील यांनी कामकाज पाहिले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद एैकून अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी पुरेश्या पुराव्याअभावी गुन्हा शाबीत झाला नसल्याने बारेला याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.