उष्माघाताने बळी गेल्याचा संशय
फैजपूर – वाघोड शिवारात विशाल भगवान म्हसाने (40) यांचा 10 रोजी सकाळी 7.30 वाजेपूर्वी मृत्यू झाला. मृत्युचे नेमके कारण कळू शकले नसले तरी उष्माघाताने हा मृत्यू झाल्याचा संशय आहे. वाघोड शिवारात मनोहर कुंभार यांच्या मालकीच्या शेतात विशाल म्हसाने यांचा मंगळवारी सकाळी मृतदेह आढळला. फैजपूर पोलिसात ज्ञानेश्वर म्हसाने यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहे.