वाघोदा महामार्गावरील पुलाच्या कामात निकृष्ट वाळूचा वापर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : दखल घेण्याची अपेक्षा

रावेर : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर वाघोद्यानजीक पुलाच्या संरक्षणासाठी निकृष्ट दर्जाच्या मातीमिक्स वाळूचा वापर करून भिंतीचे काम केले जात असतान सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुलाच्या आतापर्यंतच्या झालेल्या कामातदेखील मातीमिक्स वाळू वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे. पुलाला मजबूती देण्याच्या जागी त्याला निकृष्ट कामामुळे भविष्यात अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

निकृष्ट कामामुळे संताप
वाघोदा, ता.रावेरनजीक बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असलेला पुलाला मजबूती करण्यासाठी तसेच त्याला मजबूती देण्यासाठी शासनाकडून देखभाल दुरुस्तीतुन सुमारे 18 लाख रुपये खर्च करून महामार्गावर असलेल्या पुलाला संरक्षण भिंत उभारण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे परंतु या काँक्रिटीकरणात मातीमिक्स वाळू वापरली जात आहे यामुळे कामाचा गुणवत्तेचा दर्जा घसरत आहे. याकडे सावर्जनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

चौकशी करून सांगतो : इम्रान शेख
पुलाच्या कामासाठी मातीमिक्स वाळु वापरली जात असेल तर चौकशी करून सांगतो तसेच मला याबाबत माहिती नसल्याचे मोघम उत्तर सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता इम्रान शेख यांनी दिले.