वाघोदा शिवारात घरफोडी; 49 हजारांचा ऐवज लंपास

0

नंदुरबार । उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोडी झाली आहे. वाघोदा शिवारातील भाग्योदय नगरमधील एका घरातून चोरांनी 49 हजार रुपये रोख चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे. पंचायत समितीत नोकरीला असलेले अनिल निंबा पाटील हे मकर संक्रांतनिमित्त गावाला गेले होते. ही संधी साधत चोरांनी त्यांच्या घरी घरफोडी केली. यावेळी चोरांनी घरातील 49 हजार रोख रक्कम लंपास केली आहे, याबाबत अनिल पाटील यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.