हजारो रुपयांचा ऐवज लंपास : ग्रामस्थांमध्ये घबराट
भुसावळ : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा गावात चोरट्यांनी दोन बंद घरांमध्ये चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी पहाटे घटनेचे वृत्त कळताच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतले. दुपारी जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले तसेच तज्ज्ञांनीही ठसे घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार रघुनाथ महाजन व अनिल माळी हे बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली असून दररोज होणार्या चोर्या-घरफोड्यांसह दरोड्यांमुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.