जळगाव । विज्ञानाची प्रगती ज्या प्रकारे होत आहे, त्या प्रगतीचा परिणाम विज्ञान लेखनावर देखील होताना दिसत आहे. विज्ञानामुळे अनेक नविन शब्द तयार होत आहेत. त्या शब्दांना मराठी भाषेत नविन शब्द मिळत नाही. यामुळे त्याच शब्दाचा वापर विज्ञान लेखणात होत आहे. विज्ञान लेखन करताना भाषा महत्वाची नसून जे शब्द वाचकांना समजतील त्याच शब्दाचा वापर विज्ञान लेखनात करण्यात यावा असा सूर तिसर्या विज्ञान साहित्य संमेलनात आयोजित ‘विज्ञान लेखन’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी लेखकांकडून उमटला.
नुतन मराठा महाविद्यालयाच्या जगदिशचंद्र बोस सभागृहात मराठी विज्ञान परिषदेकतर्फे आयोजित तिसर्या विज्ञात संमेलनाच्या दुसर्या दिवशी पाहिल्या सत्रात रविवारी विज्ञान लेखन विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील अ.पां.देशपांडे हे होते. तर सोलापूर येथील प्रा.राजाभाऊ ढेपे, सांगलीचे प्रा.मोहन मव्दाण्णा, मुंबई येथील डॉ.विवेक पाटकर, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.एल.पी.देशमुख आदी सहभागी झाले होते. चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाव्दारे आपले विषय मांडले. त्या प्रत्येक विषयावर चर्चा करण्यात आली.
विज्ञान लेखनात मराठी भाषेचा वापर गरजेचे
सध्याचा काळात विज्ञानामुळे अनेक नवीन शब्द तयार होत आहेत. की ज्या शब्दांना मराठी भाषेत दुसरा शब्द उपलब्ध नाही. विज्ञान लेखनात किंवा मराठी भाषेचा लेखनात हे शब्द वापरले जात आहे. या शब्दांचे उदाहरण देखील या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांकडून देण्यात आले. तर मराठी भाषा समृध्द करण्यासाठी विज्ञान लेखनात मराठी भाषेचा वापर करण्याची गरज असल्याचे मत चर्चासत्रात उपस्थित काही लेखकांनी मांडले.
गणितांच्या विविध प्रकारांची दिली माहिती
गणिताच्या गर्तेत जावून आज अभ्यास करण्याची गरज आहे. ज्या विद्यार्थ्याला गणिताच्या या भागात जावू नको असे आपण सांगतो. तोच विद्यार्थी त्या विषयात सार्वाधिक गुण मिळवत असल्याचे डॉ. विवेक पाटकर यांनी गणित विज्ञात या विषयावर मत व्यक्त करतांना सांगितले. तसेच त्यांनी गणिताच्या विविध प्रकारांची माहिती देखील यावेळी दिली. तर प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांनी वनस्पती शास्त्रावर आपले मत व्यक्त करताना आदिवासी समाज वनस्पती शास्त्राची जतन करणारा समाज असून, विज्ञान लेखन करताना त्यांच्यावर लेखन करण्याची गरज आहे.