वाचनव्यासंगतेमुळेच बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला उभारी

0

पिंपरी-चिंचवड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य कार्यामध्ये त्यांनी वाचलेले ग्रंथ व वाचनव्यासंगतेचे खूप मोठे श्रेय असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व नालंदा वाचनालय चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय व्याख्यानमाला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.

यांनी पटकावली बक्षिसे
पिंपरी येथील डिलक्स चौकात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ नेरकर, नालंदा वाचनालयाचे अध्यक्ष विजय जगताप आदी उपस्थित होते. व्याख्यानमाला स्पर्धेमध्ये अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे (प्रथम), मधुश्री ओव्हाळ (द्वितीय) व सुदाम कांबळे (तृतीय) या विजेत्यांना पुस्तकांचा संच, प्रमाणपत्र व राज्यघटनेची प्रस्ताविका आमदारांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तर उत्तेजनार्थ पारितोषिक संभाजी बारणे व गुलाम अली भालदार आदींना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जगताप यांनी केले तर राहत खान यांनी आभार मानले.