प्राचार्य मंगला साबद्रा ; भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाचे थाटात उद्घाटन
भुसावळ- करीयर निवडताना स्वतःच्या क्षमता ओळखून आधी स्वतःला ओळखावे तसेच आपल्यामधील वाचन संस्कृती वाढवावी यासाठी निरनिराळ्या आत्मचरीत्रांचे वाचन केले पाहिजे तेव्हाच उच्च शिक्षणाची दिशा बदलेल आणि उच्च शिक्षणाची स्थिती सुधारावयाची असेल तर एखाद्या कार्याशी समरस होऊन आपण कार्य करीत नाही तो पर्यंत आपला विकास किंवा आपल्याला यश प्राप्त होणार नाही, असे विचार प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भूगोल सप्ताहाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्राचार्य साबद्रा बोलत होत्या.
चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात रहावे -साबद्रा
उच्च शिक्षणात विकासाभिमुखता आणायची असेल तर इतर व्यक्तींच्या सहवासाचा परीरणाम आपल्या वर होतो म्हणून आपण चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात रहावे, मंगला साबद्रा यांनी सांगून चांगल्या व्यक्तींमुळेच आपले व्यक्तिमत्व फुलते त्याच प्रमाणे बाबा आमटे, प्रकाश आमटे, किरण बेदी, सुनील गावस्कर अशी थोर व्यक्तिमतत्वे जी होऊन गेली त्यांच्या चरीत्रांचा ओहापोहदेखील यावेळी त्यांनी केला. आपल्यातून नकारात्मकता निघून सकारात्मकता येईल त्याच वेळेला उच्च शिक्षणात सुधारणा होईल, असेही त्यांनी सांगितले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. विशेष उपस्थिती संजयकुमार नाहाटा यांची होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, भूगोल विभाग प्रमुख प्रा. व्ही.पी.लढे, भूगोल मंडळ सचिव शुभम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोजच्या फिरण्याचा भूगोलाशी संबंध – डॉ.फालक
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, भूगोलशास्त्र हा संपूर्ण प्राणी मात्रांशी निगडीत असून प्रत्येक वेळी भूगोलाचा आधार हा घ्यावाच लागतो. रोजच्या फिरण्याचा देखील संदर्भ भूगोलाशी असण्याचा आपल्याला दिसून येतो तसेच अशा प्रकारच्या सप्ताहातून मुलांना असंख्य ज्ञानाची दालने उघडे होतात, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.चंद्रकांत सरोदे, प्रा.नीलिमा पाटील, प्रा.संगीता भिरूड, प्रा.शंकर पाटील, प्रा.उषा कोळी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन भूगोल सप्ताह समन्वयक प्रा. प्रशांत पाटील तर आभार प्रा.अविनाश साळुंके यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्रा.अजय तायडे यांनी करून दिला. यशस्वीतेसाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, प्रा.अविनाश साळुंके, प्रा.उषा कोळी, भूगोल मंडळ सचिव शुभम पाटील, प्रवीण पवार यांनी परीश्रम घेतले.