वाडा (संतोष पाटील) : कुपोषीत मुलं असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य सेवा आणि अंगणवाडी केंद्र बेभरवशावर चालत असल्याचे समोर आले आहे. इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आरोग्य सेवा देण्यासाठी नेमलेले आरोग्य कर्मचारी दिवसाआड आरोग्य सेवा देतात. तर येथे नियुक्त केलेले कर्मचारी यांनी येथे आरोग्यसेवा पुरवावी अशी मागणी मांगरूळ गावचे रहीवाशी अर्जुन तराळ यांनी वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सादर केलेल्या निवेदनात केली आहे. तसेच इथल्या उंबरपाडा अंगणवाडी केंद्र उभारण्यात यावे. अशी मागणी रहीवाशांकडून केली जाते आहे. वाडा तालुक्यातील अति दुर्गम भागातील मांगरूळ, उज्जैनी, परळी, पाचघर या भागात बहुतांशी आदिवासी समाज वास्तव्यास आहे. इथल्या लोकवस्तीत कुपोषणाची समस्या असताना ही येथील आरोग्य सेवेबरोबर कुपोषीत बालकांच्या पोषण आहाराच्या आणि गरोदर व स्तनदा मातेंच्या आरोग्याबाबत चिंतेचा विषय बनला आहे. माहे जुलै 2017 मध्ये मांगरूळ आरोग्य उपकेंद्रात 13 मुले कुपोषीत असल्याची नोंद वाडा पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून माहीती देण्यात आली.
अंगणवाडी सेविकांची पद रिक्त
मांगरूळ गावात 7 पाडे वंगनपाडा अंगणवाडी सेविका नाही उंबरपाडा येथे अंगणवाडी केंद्र खाजगी घरात भरतेय मुलांची संख्या 68 तर 400 लोकवस्ती, वंगनपाडा 50 पट व 200 च्या लोकवस्ती आहे. इथल्या वंगणपाडा अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी सेविकेचे वर्षभरापासुन पद रिक्त आहे. तर उंबरपाडा अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका आहे पण अंगणवाडी केंद्राला जागा नाही. इथे मंजुरीत असलेल्या अंगणवाडी केंद्राचे काम अपुर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याने रहीवाशीयांनी वाडा पंचायत समिती समोर 21 जुन 2016 रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनावर जिल्हा परिषदेच्या उपअभियंता वाडा यांनी पुनर्रबांधणीसाठी मूल्यांकन करू असे आश्वासन मोर्चेकरांना दिले होते. मात्र अजुनही अंगणवाडी केंद्राची समस्या कायम आहे.
चोविस तास आरोग्य सुविधा देणे गरजेचे
मांगरूळ उपकेंद्रात चोविस तास सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे इथल्या गरोदर मातांची प्रसूति घरीच अथवा दुरवर आरोग्य केंद्रात न्यावे लागते. सर्प, विंचू दंशाचे आणि कुपोषणाचे प्रमाण असल्यामुळे येथे चोविस तास आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे. तसे निवेदनही वाडा पंचायत समिती विभाग 26 जुलै 2017 रोजी निवेदन दिले असल्याची माहीती मांगरूळ येथील रहीवाशी अर्जुन धवळ्या तराळ यांनी यावेळी बोलताना दिली.
वंगनपाडा इथल्या अंगणवाडी केंद्रातील रिक्त अंगणवाडी सेविका पदाचे गुणांकन इतर प्रकल्प अधिकार्यांनी केले असून त्याच्या निवडीचा ठराव ग्रामसभेने घ्यावयाचा आहे. ग्रामसभेने ठराव न घेतल्यास याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.
– जी.खोसे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वाडा
या उपकेंद्रातील नर्सेसला मुख्यालयीन राहून काम करा असे परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय कर्मचार्यांना सुचना केली आहे. ही बाब मांगरूळ आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य कर्मचार्यांना लागू आहे.
– डि.डी.सोनावणे, वाडा तालुका वैधकीय अधिकारी