वाडा शहरातील विकासकामांचे भूमिपूजन

0

वाडा । शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांच्या प्रयत्नातून सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या मंजूर झालेल्या वाडा शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्‍विनी शेळके, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य मेघना पाटील, वाडा पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. गेली अनेक वर्षे वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने या रस्त्यांवरून चालणेही मुश्कील झाले होते.

कार्यक्रमाप्रसंगी अधिकार्‍यांची उपस्थिती
नागरिकांची ही मुख्य समस्या लक्षात घेऊन नीलेश गंधे यांनी विशेष प्रयत्न करून वाड्यातील स्टेट बँक ते पंचायत समिती वाडा रस्ता, वाडा-मनोर मुख्य हायवे रस्ता ते कांदिवली रस्ता, वाडा सिद्धेश्‍वर ते गाळे रस्ता, वाडा-देसई मुख्य रस्ता ते यशवंत नगर रस्ता प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर करून येथील रस्ते मंजूर करवून घेतले होते. भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय जाधव, शिवसेना वाडा तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख प्रकाश केणे, उपतालुकाप्रमुख तुषार यादव, तालुका सचिव अमित रोडगे, श्रीकांत आंबवणे, तुषार भानुशाली, नीलेश पाटील, उमेश लोखंडे, संजय तरे शिवसैनिक उपस्थित होते.