वाडी । शिरपूर तालुक्यातील पाणी पुरवठ्याची थकबाकी रक्कम न भरल्यामुळे महावितरण कंपनीने 48 गावांमधील विज खंडीत केली आहे. त्यानूसार वाडी बु येथील ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापासुन विद्युत बिल अदा न केल्यामुळे विद्यूत महामंडळाने विज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासुन गावाला पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडे विद्यूत वापराचे एकूण 26 लाख रूपये थकित असल्याचे वाडी महावितरण सब स्टेशनचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले असून दोन महिन्याचे थकित बिल 1 लाख 20 हजार रूपये भरल्यास पुर्न विद्यूत पुरवठा जोडून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
पाच वर्षापासून बिल थकीत
दरम्यान थकित बिल भरण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन गावातून घरपट्टी वसुलीची मोहिम राबवत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.गावात दोन ट्यूब वेल द्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पाच वर्षापासुन महामंडळाचे बिल वर्षानुवर्ष ग्रामपंचायतीकडे थकत असल्याने विद्यूत महामंडळाने ग्रामपंचायतीकडून महावितरण कंपनीने कनेक्शन कट केल्यामुळे गावात आठवड्याभरापासुन पाणीपुरवठा बंद आहे.यामुळे गावातील नागरिकांची चांगलीच पंचायत झाली आहे. दरम्यान या कारवाईमुळे गावातील लोकांना पिण्याचे पाणी नळातून मिळत नसल्यामुळे काही लोक आपआपल्या सोयीनुसार शेतातून बैलगाडी,मोटार सायकल ट्रॅक्टर वर पाणी आणत आहेत. तर ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही असे महिला पुरूष मैलो पायी चालुनपाणी आणत आहेत.
थकीत बिल न भरल्याने पाणी पुरवठा करणारी विद्युत सप्लाय बंद
गेल्या मार्च महिन्याअखेर उर्जामंत्र्याच्या आदेशनानूसार काढलेल्या परिपत्रकात ग्रामपंचायतीना बिलात सुट देवून रक्कम भरण्याचे आवाहन केले होते. या योजनेत काही ग्रामपंचायतींनीसहभाग घेतला नाही. व थकित बिले भरले नसल्याचे निदर्शनात आल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी विद्यूत सप्लाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार वाडी गावासह वाडी झोन मधिल 18 गावांचा विद्यूत सप्लाय बंद करण्यात आला आहे.
– सोनवणे,कनिष्ठ अभियंता,वाडी सब स्टेशन