वाडी बु. ॥ येथील अतिक्रमण 15 दिवसांत काढा

0

बभळाज । शिरपूर तालुक्यातील वाडी बु। येथील ग्रामपंचायत हद्दीत गावठाण जागवेर डॉ. दिवाणसिंग गिरासे यांनी अतिक्रमण करून दुमजली इमारतीचे बांधकाम केलेले आहे. हे अतिक्रमण काढण्याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी आदेश पारीत केले आहेत. परंतु, दिवणसिंग रूपसिंग राजपूत यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केली होती. यावर सुनावणी झाली असता दिवाणसिंग राजपुत यांची याचीका फेटाळून लावण्यात आली आहे. तर रज्जाक शब्बीर पटेल यांची याचीकेद्वारे केलेली अतिक्रमण काढण्याची माणगी कायम ठेवून 15 दिवसांत अतिक्रमण काढण्याचा निकाल दिला आहे.

5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा
रज्जाक शब्बीर पटेल यांनी ग्रामपंचायत गावठाण हद्दीत दिवणसिंग रूपसिंग राजपूत यांनी अतिक्रमण करून दुमजली इमारत बांधली आहे. याची माहिती अधिकार कायद्यान्वये संपूर्ण माहिती घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत पंचायत समिती शिरपूर, जिल्हा परिषद धुळे व शिरपूर न्यायालयाकडे तक्रार दाखल करून सुमारे 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा केला. यावर तत्कालीन जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्त, शिरपूर न्यायालय, धुळे न्यायालय यांनी अतिक्रमण काढणेबाबत स्पष्ट निकाल दिलेला असतांना राजपूत यांनी औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल करून वाडी बु। गावात इतरांचेही अतिक्रमण असतांना माझेच अतिक्रमण का काढण्यात येत असून, माझ्यावर अन्याय असल्याचे म्हटले आहे. दिवाणसिंग राजपुत यांच्यावर भेदभाव झाला नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवून राजपूत यांची याचीका फेटाळून रज्जाक पटेल यांनी केलेल्या याचिकेनुसार ग्रामपंचायतीने केलेली कारवाई बरोबर असल्याचा निकाल न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश एस. पाटील यांच्या पीठाने दिला. रज्जाक पटेल यांच्या वतीने अ‍ॅड. निमा सुर्यवंशी यांनी तर दिवाणसिंग राजपूत यांच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी कामकाज पहिले.