वाड्यातील हिंगलाज माता मंदिरात चोरीमुळे घबराट!

0

वाडा । येथील खंडेश्‍वरी नाक्यावर हिंगलाज मातेचे पुरातन काळातील मंदिर आहे. या मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम चोरून व दानपेटी मंदिराच्या मागच्या बाजूला टाकून पोबारा केला. हिंगलाज मातेचे हे मंदिर विशेष म्हणजे रहदारी असलेल्या भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील खंडेश्‍वरी नाक्यावर आहे.

याठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार्‍या ठिकाणाला लागूनच आहे. मात्र, या ठिकाणी सध्या रात्रीची गस्त नसल्याने चोरी झाल्याचे बोलले जात आहे. नवरात्रीच्या दरम्यानही भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सात तोळ्याची गंठण व अन्य दागिने मोटारसायकलवर आलेल्या चोरांनी खेचून नेली होती. यासंदर्भात लवकरात लवकर तपास करून चोरांना जेरबंद करण्याची मागणी हिंगलाज माता ट्रस्टचे अध्यक्ष निखिल भानुशाली यांनी केली आहे.