वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

0

वाडा । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्यातील संघटनात्मक बांधणी करण्यासह आगामी नगर पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी वाड्यात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन वषार्ंपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून असंख्य कार्यकर्ते इतर पक्षांत गेले. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था होती व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. ती झटकण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते आले होते तसेच या मेळाव्यामध्ये कुंभीस्ते-दाहे, नवापाडा, वरई येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा हे अध्यक्षस्थानी तर आमदार, पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जोरात कामाला लागा
यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी, शेतकरी कर्जमाफी, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली तालुक्यातील येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका तसेच वाडा नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याने जोरात कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना या मेळाव्यात सांगण्यात आले. यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष इरफान भुरे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष अतिश पाटील, सरचिटणीस मनोज विशे, जव्हार नगराध्यक्ष संदीप वैद्य, हरिभाऊ पाटील, वैभव ठाकरे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पटारे शहराध्यक्ष अमीन सेंदू आदी मान्यवरांसह. मेळाव्यास तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.