वाड्यात स्वाईन फ्लूचा रुग्ण

0

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस या गावी स्वाईन फ्लू आजाराचा रूग्ण आढळला असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शामीम जळगावकर (वय 58) असे रूग्ण महिलेचे नाव आहे. शामीमया गेल्या काही दिवसापासून आजारी असून त्यांची तपासणी केली असता त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.

त्यांच्यावर पनवेल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय रुग्णालयात रूग्ण न आल्याने त्याची कल्पना मला नाही अशी माहिती त्यांनी दिली.