वाढत्या अवैध धंद्याविरोधात सांगवीमध्ये ‘मटका मोर्चा’

0

अपना वतन संघटनेने काढला मोर्चा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्यधंदे वाढल्याचा आरोप करत अपना वतन संघटनेने शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यावर ‘मटका मोर्चा’ काढला. अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. पिंपळेगुरव येथील काटेपुरम चौकातून शनिवारी सकाळी मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाने सांगवी ठाण्यावर धडक मारली.

सिद्दीक शेख म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी, अवैधधंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य जनता प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच शहरात अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. या अवैध धंद्यांपासून महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक तरुण वाममार्गाला जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी शहरातील अवैद्यधंदे त्वरित बंद करावेत.