चिंबळी : खेड तालुक्यात इद्रायंणीनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांमुळे परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेती बागायती झाली आहे. तसेच शहरातून विविध प्रकारच्या फुलांना चांगली मागणी असल्यामुळे फुलशेती केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा परतीच्या पावसाचा फुलशेतीला फटका बसल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. तर थंडी वाढल्याने फुलशेती बहरली आहे.