वाढदिवसाचा खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांना 51 हजाराची मदत

0
राजेंद्र जगताप यांनी जपली सामाजिक बांधिलकी   
नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व  माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून केरळ पुरग्रस्तांना 51 हजाराची आर्थिक मदत  करत सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच दुष्काळी भागातील व आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांचे संगोपन करत असलेल्या स्नेहवन संस्थेस 11 हजार रूपयांची आर्थिक मदत केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, सामाजिक कार्यकर्ते विजूअण्णा जगताप, उद्योजक विजयशेठ काटे, युवा नेते शाम जगताप, तानाजी जवळकर, अमरसिंग अदियाल, शिवाजी पाडुळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, किसनराव नवले, श्री लक्ष्मण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनिल कदम, भाऊसाहेब जांभूळकर, अनुप काटे, प्रा. महादेव रोकडे, अभिषेक जगताप, रवी सगट आदी पाहुण्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक महिला, युवा कार्यकर्ते यांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रभागतील महिला बचत गटातील सभासदांना तुळशीचे रोपटे व गृहपयोगी वस्तु तसेच आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांनी माजी नागरसेवक राजेंद्र जगताप यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या.