वाढदिवसाच्या कार्यक्रमात दोन गटात दगडफेक

0
दोन गटावर परस्परविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा
जळगाव – प्रिंपाळा परीसरात एका परीवाराच्या घरात वाढदिवसाच्या कार्यक्रमात डीजेत नाचतांना एकाच्या पायावर दुसऱ्याचा पाय पडल्याने एकाच्या थोबाडीत मारल्याने दोन गटात हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून यात घटनेतील दोघे जखमी झाले आहे. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुडको पिंप्राळा परीसरातील घटना
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, नातेवाईकांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात डिजेवर सुरेश आनंदा माळी (वय-32) रा. मरीमातेच्या मंदीराजवळ पिंप्राळा हुडको यांच्यासह बापू वसंत सोनवणे आणि रमेश हरचंद मोरे हे नाचत होते. यावेळी नाचत असतांना एका मुलाचा सुरेश माळी यांच्या पायावर पाय पडला. यात एकाने मुलाच्या कानशिलात लगावली. याचा राग आल्याने मुलाकडील नातेवाईक आरोपी कपिल सुनिल मरसाळे, अजय सुनिल मरसाळे यांच्यासह 8 ते 10 जणांनी येवून लाठ्या काठ्यांनी मारहाण करून दगडफेक केली. यात दोघेजण जखमी झाले. कार्यक्रमात बेकायदेशीर मंडळी जमा करून मारहाण केल्याप्रकरणी सुरेश आनंदा माळी यांच्या फिर्यादीवरून कपिल सुनिल मरसाळे, अजय सुनिल मरसाळे यांना अटक केली असून दोघा आरोपींसह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय श्री. ठोंबरे करीत आहे.
दोन गटात लाठ्या काठ्यांनी केली मारहाण
दुसऱ्या गटातील अजय सुनिल मरसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समोरील गटातीत आरोपी बापू वसंत सोनवणे, दौलत आनंदा माळी यांच्यासह चौघांनी काहीही एक कारण नसतांना मुलाच्या कानशिलात लगावली असा अरोप करत सहा जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली असून, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी बापू सोनवणे आणि दौलत माळी यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर मुन्ना, दिपक, राकेश आणि योगेश मोरे (पुर्ण नाव गाव माहित नाही) हे फरार आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अरूण पाटील करीत आहे.