तळेगाव : वाढदिवसाच्या किरकोळ वादातून मामा आणि भाच्यावर वार करण्यात आले. ही घटना जय बजरंग तरुण मंडळ दाळाडी येथे सोमवारी (दि.2) रात्री आठच्या सुमारास घडली.याप्रकरणी अजय महादेव बंडलकर (वय 19, रा. तळेगाव) याने तळेगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय महादेव बंडलकर, त्याचा मामा अमोल भीमा चुकाटे आणि आरोपी यांच्यामध्ये महिला काही दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या कारणावरून किरकोळ वाद झाले होते. याचा राग मनात धरून चार आरोपींनी अजय आणि त्याच्या मामाला दाळाडी येथे गाठून अजय याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच अजय चा मामा अमोल भीमा चुकाटे यांच्या टोक्यात वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. तळेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.